पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाला बॉम्ब स्फोटाची धमकी   

चंडीगढ : पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाला गुरुवारी ईमेलद्वारे बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली. धमकीनंतर पोलिसांनी न्यायालय परिसर रिकामा केला असून, सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली आहे. पोलिसांकडून परिसरात शोध घेण्यात आला मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. 
 
उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाला एक ईमेल पाठवण्यात आला होता. त्यामध्ये संकुलात आयईडी लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणार्‍या पथकासह पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी कसून शोध सुरू केला. शहर प्रशासन आणि उच्च न्यायालयाच्या अधिकार्‍यांसह सर्वांनी सहकार्य केल्यामुळे कोणतीही घबराट निर्माण झाली नाही, असे चंदीगड पोलिस अधिक्षक उदयपाल सिंह यांनी सांगितले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन म्हणाले, आम्ही सुनावणीसाठी न्यायालयात होतो. न्यायालयाच्या एका खोलीत चंदीगड पोलिस दाखल झाले. त्यांनी धमकीच्या मेलबद्दल माहिती दिली.
 

Related Articles